पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २२५ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब लबडे यांनी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. पुण्यश्र्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस भाऊसाहेब लंबडे व किशोर देवधेकर, पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सह सचिव कृष्णा मर्ढेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव गणेश पाटील, खारघर राष्ट्रवादी युवक खारघर कार्याध्यक्ष प्रदिप पाटील, खारघर प्रभाग क्र. ५ अध्यक्ष महेशकुमार राऊत, प्रशांत जाभुळकर , वैभव दळवी, रामदास नारकर, हेमंत धायगुडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप कांबळे , गौतम तांबे, आनंद बोबडे, बालेश भोजने , शंकर होनमाने आदी उपस्थितीत कार्यकते होते.
कोकण दर्पण





