पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा सर्वीकडेच आहे. तरी मोठया प्रमाणात रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिराला लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर तसेच भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी भेट दिली. सदर शिबिराचे आयोजन नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या माध्यमातून व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर शिबिरात भाजपा खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेशभाई पटेल यांनी देखील रक्तदान केले. शिबिराला भेट देण्यासाठी प्रविण पाटील स्थायी समिती सभापती पनवेल मनपा,नगरसेवक रामजी बेरा, अभिमन्यूशेट पाटील, खारघर नागरी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.पंकज तितर त्याच बरोबर सकाळचे पत्रकार गजानन चव्हाण, भाजपा खारघर तळोजा मंडळ सरचिटणीस किर्ती नवघरे, दिपक शिंदे यांसह अनेकांनी भेट देत रक्तदात्यांचे आभार मानले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा खारघर तळोजा मंडळ व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप जाधव, सहसचिव भरत कोंढाळकर,संदिप एकबोटे, दिनेश यादव, कुशल इंगळे यांनी मेहनत घेतली.
कोकण दर्पण.