Press "Enter" to skip to content

समाजासाठी लढणारा योद्धा : प्रसाद पाटील !

संजय महाडिक :-
आपण ज्या समाजात जन्मलो , वाढलो . घडलो , त्या समाजाचे आपण देणेकरी लागतो हि भावना उराशी बाळगून सातत्याने समाजासाठी धावणारा लढणारा योद्धा म्हणजे पनवेल तालुक्यातील तळोजा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील होय. सामाजिक दायित्व निभावणारा प्रसाद पाटील एक सच्चा समाजकर्मी आहे. प्रसाद पाटील हे सामाजिक एकटा संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल जिल्ह्याचे ते सहसचिव आहेत.

एखादा हाडाचा कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद पाटील होय. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विशेषतः तळोजा परिसर विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून समाज मनात आपला वेगळा ठसा प्रसाद पाटील यांनी उमटविला आहे. तळोजा विभागातील विविध नागरिक प्रश्न सोडविण्यासाठी सिडको, पनवेल महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रसाद पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी सातत्याने पार पाडली आहे.

तळोजा फेज १ आणि फेज २ हे सिडको निर्मित नवीन क्षेत्र आहेत. येथील नागरिकांना सुरवातीच्या काळापासूनच विविध नागरी समस्या भेडसावत होत्या. या समस्या सिडको आणि मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करून सोडविण्यात प्रसाद पाटील यांचे मोठे योगदान आहे. तळोजा मधील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कमी जास्त प्रमाणात हे समस्या सातत्याने भेडसावत असते. प्रसाद पाटील यांनी सिडको प्रशासनाचा पाठपुरावा करून येथील रहिवाशांना न्याय देण्यासाठी लढा दिला आहे. हा लढा कायम सुरु आहे. तळोजा मधील लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने परिसरात पोलीस चौकी सुरु करून २४ तास सुरु ठेवावी , अशी प्रसाद पाटील यांची मागणी आहे.

मागील वर्षभरात एकता सामाजिक संस्थेच्या मध्यातून विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रम राबविले. महिला, वयोवृद्ध , विध्यार्थी यांच्या साठी अनेक कार्क्रम आयोजित केले. आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर ,तसेच विविध जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात प्रसाद पाटील यांचा नेहमी पुढाकार असतो. सुमारे पाचशे महिलांना गृहउद्योक सुरु करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तळोजा फेज २ मधील नागरिकांना सध्या भेडसावणारा प्रश्न म्हणजे भुयारी मार्ग होय. सिडकोने तळोजा फेज २ आणि खारघरला जोडणारा भुयारी मार्ग बांधला खरा मात्र त्याचे भरकलेले नियोजन नागरिकांची डोकेदुखी झाली आहे. भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहते, त्यामुळे तिथला मार्ग बंद आहे. सदर प्रश्न सोडविण्यासाठी प्रसाद पाटील सातत्याने सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. सध्या किमान रेल्वे फाटक ओलांडण्यासाठी चांगला रस्ता बनवावा , अशे मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटात एक योद्धा म्हणून प्रसाद पाटील यांनी आपली भूमिका पार पाडली. कोरोनाचे संकट मोठे असल्याने सामान्य नागरिकांना ऍन मिळणे कठीण झाले. अशा नागरिकानासाठी अन्न वाटप करण्याचे मानवी कल्याणाचे , अन्नदानाचे कार्य प्रसाद पाटील यांनी केले. पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना मास्क , सॅनिटायझर , अन्नधान्य वाटप केले. स्वतःच्या खर्चाने देखील अन्नधान्य वाटप केले. लोकांच्या अडचणीत सदैव धावून जाणारा एक सच्चा नेता म्हणून प्रसाद पाटील यांची ओळख आहे. त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल अशीच यशस्वी होवो , हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सदिच्छा !

कोकण दर्पण .