लॉकडाऊनच्या काळात खारघर कोपरा ब्रिजच्या रस्त्यावर दगड ठेऊन खारघरचा प्रवेश बंद करण्यात आला होता. परंतू अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन महिना उलटला तरीही प्रशासनाने ते दगड काही काढले नाही. त्यामुळे खारघरच्या रहिवाशांना मोठा फेरा मारून मुख्य रस्त्यावर यावे लागत होते. म्हणून प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक माजी सभापती अभिमन्यु धर्मा पाटील यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या मार्गदर्शना खाली आमदार प्रशांत ठाकुर व पनवेल महानगरपालिकेचे गटनेते परेश ठाकुर यांच्या सहकार्याने जेसीबी लाऊन सर्व लहान मोठे दगडे हटवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे खारघर मधील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी काशीनाथ घरत, अशोक पवार युवानेते नितेश अभिमन्यु पाटील, विरेंद्र सिंग व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
खारघर कोपरा रस्ता वाहतुकीसाठी खुला !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »