पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्ह्याच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित रक्तदान शिबिर पनवेल मधील लॉकडाऊनमुळे रद्द करावे लागले होते . सदर शिबीर रविवार दिनांक ०९ ऑगस्ट २० रोजी सकाळी १०.१० वाजता संपन्न झाले.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घघाटन झाले . सदर शिबिरास युवकांनी चांगला प्रतिसाद दिला. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा सचिव मोहम्मद अफरोज अब्दुल बशीर शेख, राष्ट्रीय उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल फारुख पटेल, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष शहबाज पटेल, राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष शुभंम कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष हर्षद लोखंडे, गणेश पाटील, जिल्हा सचिव गोविंद मोरे, जिल्हा सचिव सुहास बनसोडे, जिल्हा संघटक अभिषेक चारी, प्रभाग-३ अध्यक्ष श्री.अजित माने, प्रभाग-३ उपाध्यक्ष हरिस शेख,प्रभाग -३ सचिव अबु सालेम,प्रभाग -३ संघटक अख्तर शेख आदी प्रमुख उपस्थित होते.
कोकण दर्पण