Press "Enter" to skip to content

शिवसेना रायगड जिल्ह्याच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध ! जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कर्नाटकातील बेळगाव येथील मानगुति गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढल्याने रायगड जिल्हा शिवसेनेनेच्या वतीने आंदोलन करून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

छत्रपती शिवरायांचा पुतळा काढल्याने महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदर कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी रविवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना पनवेल शाखा येथे शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील,उपजिल्हाप्रमूख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगर प्रमूख दिपक घरत, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, शहर प्रमुख अच्युत मनोरे, सदानंद शिर्के, राकेश गोवारी, निलेश भगत, रुपेश ठोंबरे शहर संघटक प्रवीण जाधव,विभाग प्रमुख पद्माकर पाटील ,विलास कामोटकर,कुणाल कुरघोडे युवासेना, महिला आघाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण