Press "Enter" to skip to content

विजेच्या समस्या दूर करा – आमदार महेश बालदी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : उरण तालुक्यातील विजेच्या समस्यांसंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत उरण नगरपरिषदेच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी विजेच्या समस्या दूर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.            
या बैठकीत ०५ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने बहुतांश गावांमध्ये वीज नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. तसेच काही दिवसांवर गणेशोत्सव येत असून या काळामध्ये वीजपुरवठा नियमित करण्याबाबत आमदार महेश बालदी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या बैठकीस उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, मुख्य अभियंता चव्हाण, अधिक्षक अभियंता शुभांगी, कार्यकारी अभियंता राठोड, नगरसेवक कौशिक शहा, राजू ठाकूर, नंदू लांबे, मेघनाथ म्हात्रे, जितेंद्र घरत, सुनिल पाटील, जसीन गॅस, मनोहर साहरिया आदी उपस्थित होते.

कोकण दर्पण.