Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने कळंबोली कोविड हॉस्पिटल, पनवेल पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्कचे वाटप ! भाजपा रायगड सचिव गीता चौधरी यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा आमदार तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांनी कळंबोली येथील कोविड हॉस्पिटल आणि पनवेल सिटी पोलीस ठाण्यात सॅनिटायझर , मास्क तसेच अन्य वैद्यकीय साहित्याचे वाटप केले. कोविड हॉस्पिटल प्रशासन आणि पनवेल सिटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे सदर वैद्यकीय साहित्य सुपूर्द करण्यात आले.

सध्या कोरोनाचे संकट सर्वत्र आहे. कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी डॉक्टर्स , नर्स , सफाई कामगार , पोलीस दिवसरात्र लढत आहेत. कोरोनाशी लढून जनतेचे रक्षक करणाऱ्या या कोविड योध्यांच्या सेवेचा उपक्रम भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांनी राबविला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गीता चौधरी यांनी कळंबोली येथील कोविड हॉस्पिटलमध्ये ५० लिटर्स सोडियम हायपॉक्लोराइट, २० लिटर्स सॅनिटायझर , ५ लिटर्स फिनाईल, २०० मास्कस , १० किलो सर्फ वाटप केले. कोविड लढाईतील गीता चौधरी यांचे योगदान नक्कीच महत्वपूर्ण आहे.

कोकण दर्पण.