Press "Enter" to skip to content

सार्थक पाटीलच्या यशाबद्दल ग्लोबलचे एम.डी. सुरज म्हात्रे यांनी केले कौतुक !

उरण , कोकण दर्पण वृत्तसेवा : कामगारनेते सुरेश पाटील यांचे चिरंजीव सार्थक पाटील याने दहावीच्या परीक्षेत ९२.८० टक्के गुण मिळविले. सार्थकच्या यशाबद्दल ग्लोबल एव्हिएशन अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक सुरज म्हात्रे यांनी कौतुक करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उरण तालुक्यातील आर के एफ जेएनपीटी विद्यालय शेवा येथे इंग्रजी माध्यमात सार्थक शिकत होता. शाळेमध्ये उत्तम यश मिळविल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कोल्हे , पर्यवेक्षक ,शशिकांत म्हात्रे , शिक्षक श्री जोगळे मढवी, श्री कांबळे , श्री टेमकर , श्री भूषण , शिक्षिका सरोज पाटील, सुरेखा पाटील, वर्षा कीर्ती, सुतप्पा टेमकर , सवती मॅडम आदींनी सार्थकचे अभिनंदन केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »