Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने गरजूंना तांदूळ वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने खारघर मधील गरीब व गरजू कुटुंबांना तांदूळ वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने सदर उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खारघर शहर प्रभारी तथा पनवेल सहसचिव कृष्णा मर्ढेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हा जेष्ठ नागरिक सेलचे प्रमुख भाऊसाहेब लबडे,ऍड संतोष खोपडे, महेश कुमार राऊत, प्रदीप पाटील,शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत दाभोळकर यांच्या पुढाकाराने गरीब व गरजूंना प्रत्येकी १० किलो तांदूळ वाटप करण्यात आले.

कोकण दर्पण.