Press "Enter" to skip to content

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने तुर्भे येथे रक्तदान शिबिर संपन्न ! १०० हुन अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान !

रक्तदात्याला प्रमाणपत्र देताना जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या वतीने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
२७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तुर्भे स्टोअर येथील शिवसेना शाखा कार्यालयात सदर शिबिर संपन्न झाले. रक्त संकलनासाठी नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलच्या ब्लड बँकेला पाचारण करण्यात आले होते.
सध्यस्थीतीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून कोरोनाच्या काळातील सामाजिक गरज लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी दिली. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे , शिवसेनेचे नेते विजय चौगले यांनी भेट दिली.
नवी मुंबई आणि तुर्भे परिसरातील १०० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना संकटात आपले सामाजिक दायित्व दाखवले. रक्तदान शिबिराचे आयोजक जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी देखील रक्तदान करून कोरोनाच्या लढाईत आपले योगदान दिले.

रक्तदानाचे सामाजिक दायित्व निभावताना शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »