महाराष्टाच्या राजकारणातील धडाडीची तोफ, कृतिशील विचारांचा गतिशील नेता , पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांची परंपरा कायम राखून महाराष्ट्राला विकासाच्या सर्वोच्च शिखरावर नेणारा नायक अर्थात महाराष्ट्राचं खंभीर नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उप मुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार होय.
अजितदादा पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. आज आमच्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेछ्या देताना उर अगदी स्वाभिमानाने भरून येत आहे. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यध्यक्ष म्हणून काम करताना अजितदादांचे मार्गदर्शन नक्कीच मोलाचे ठरते. संघटन कौशल्य, नेतृत्व गुण, आक्रमकता, परखडपणा , पक्ष आणि संघटनेसाठी प्रामाणिक आणि जिद्दीने उभे राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आजितदादांकडून मिळाले मार्गदर्शन आहे.
अजित अनंतराव पवार यांचा जन्म देवळाली प्रवरा, अहमदनगर जिल्हा येथे २२ जुलै १९५९ रोजी झाला .अजितदादा हे महाराष्ट्रातील राजकारणी व उपमुख्यमंत्री आहेत. ते शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते आहेत. महाराष्ट्रात या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार होय. त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यमांतून व विरोधकांकडून नेहमीच प्रकाशझोतात असतात. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात भरपूर विकास कामे करुन शहराचा कायापालट केला आहे.
अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते. १९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. २००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी कॉंग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून अजितदादा यांचा प्रभाव कायम आहे. एखादे काम हाती घेतले कि ते तडीस नेण्याची कार्यपद्धती अजितदादांची आहे. अजितदादांची निर्णय क्षमता आणि स्पष्टतोक्तीपणामुळे अनेक कामे तातडीने मार्गी लागतात. पुरोगामी महाराष्ट्र हा एकच ध्यास मनाशी बाळगून फुले, शाहू ,आंबेडकर विचारांची परंपरा कायम राखुन महाराष्ट्राला एकसंघ आणि एकात्म ठेवण्याचा कायम ध्यास अजितदादा पवार यांनी मनाशी बाळगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीतील ते मोठे किमयागार आहे. त्यांच्या एका शब्दासाठी आज सामान्य कार्यकर्ता वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतो. हाच खरा एका खंभीर आणि प्रभावी नेत्याचा गुणधर्म आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात पनवेल, उरण आणि कर्जत तालुक्यांचा समावेश होता. मागील लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीने एका तरुण-तडफदार आणि उभररत्या नेतृत्वाला अर्थात पार्थ पवार यांना संधी दिली. त्यावेळी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. संघटनेसाठी कसे झोकून देऊन काम करावे , सामान्य जनतेशी आपली नाडी कशी जुळायला हवी, याचे मार्दर्शन आम्हाला मिळाले. अजितदादांकडून आम्हा कार्यकर्त्यांना मिळाले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त आहे. पक्ष आणि संघटनवाढीसाठी नक्क्कीच आम्ही मार्गी लावू. निष्ठा, सातत्य, धडपड, माणसं जोडण्याची लकब हे कौशल्य आम्हाला भविष्यात उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. आमच्या नेत्याला अर्थात अजितदादांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्या !
श्री. शहबाज पटेल
कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी युवक काँग्रेस
पनवेल शहर-जिल्हा .
संकलन : कोकण दर्पण