Press "Enter" to skip to content

पार्थ फाऊंडेशनच्या वतीने पोलीस ,डॉक्टर्सना सॅनिटाईझर वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने खारघर येथील पोलिस कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टराना सॅनिटाइझर वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा युवक कार्याध्यक्ष शहबाज पटेल, तुषार मानकर उपाध्यक्ष पनवेल शहर ज़ाहिद अली यांच्या माध्यमातून सॅनिटाईझर चे वाटप करण्यात आले.

शहबाज पटेल हे पनवेल शहरातील एक धडाडीचे युवा नेतृत्व आहे. सामाजिक उपक्रमात सातत्याने त्यांचा सहभाग असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचे योगदान आहे.

कोकण दर्पण