Press "Enter" to skip to content

तळोजा गावात निर्जंतुकीकरण मोहीम ! शहबाज पटेल यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाच्या संकट काळातील लढाईत धडाडीचे युवा नेतृत्व शहबाज पटेल यांचे योगदान सातत्याने दिसले आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष फारुकभाई पटेल,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील व पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तळोजा गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले.तळोजा गावामधून शहबाज पटेल यांचे कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी युवक कार्यकर्ते इम्रान सुभेदार,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण.