Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये आणखी ५ खाजगी कोव्हिड हॉस्पिटल ! आयुक्त सुधाकर देशमुख यांची माहिती !

खारघरमधील निरामय व पोलोराईज हॉस्पिटलचा समावेश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आणखी ५ खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची मान्यता दिल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली. त्यामुळे कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध देणे सोयीचे ठरणार आहे.
पनवेल मनपा हद्दीत कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणू (कोव्हिड-१९) या संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी असणे गरजेचे आहे. जेणेकरून रूग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य आहे. या करिता खालील रुग्णालयांना खाजगी कोविड १९ रूग्णांलय म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात शासनाने निश्चित केलेल्या शुल्कामध्ये उपचार दिले जातील, असे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

पनवेलमध्ये नव्याने मान्यता देण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये पोलारिस हॉस्पिटल, १९/सी, सेक्टर -२०, खारघर, सुअस्थ हॉस्पिटल, प्लॉट नंबर-१, सेक्टर-२० रोडपाली / नवीन कळंबोली, सत्यम हॉस्पिटल, सेक्टर ३ ई, कळंबोली, सुश्रुत कोव्हिड-१९ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,कळंबोली सेक्टर-१, कळंबोली, निरामय हॉस्पिटल, प्लॉट नंबर-५ ए, सेक्टर-४, खारघर या पाच हॉस्पिटलचा समावेश असल्याची माहिती पनवेल महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय शिंदे यांनी दिली.
खाजगी मान्यता प्राप्त हाॅस्पिटलमध्ये नागरिक कोव्हिड करिता उपचार घेऊ शकतात अशी माहिती उपायुक्त जनसंपर्क जमीर लेंगरेकर यांनी दिली.
खारघर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये सध्यस्थीतीत ५० बेडसची व्यवस्था असल्याची माहिती निरामयचे वैद्यकीय संचालक डॉ अमित थडानी यांनी दिली. खारघर येथील पोलोराईज हॉस्पिटलमध्ये ३१ बेडसची व्यवस्था आहे.

कोकण दर्पण.