Press "Enter" to skip to content

तळोजा गावात पंधरा दिवसांनी निर्जंतुकीकरण करावे : शहबाज पटेल यांची पालिका आयुक्तांकडे मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे खबरदारी घेणे , स्वछता राखणे अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे तळोजागावामध्ये दर पंधरा दिवसांनी निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबर आता पावसाळ्यात मलेरिया आणि डेंगू या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढण्याची भीती आहे. त्यामुळे आरोग्याची खबरदारी म्हणून स्वछता महत्वाची आहे. तिथला परिसर निर्जंतुकीकरण केला तर साथीच्या रोगांना आळा घालता येईल. भविष्यातील साथीच्या रोगांचा धोका टाळण्यासाठी सातत्याने निर्जंतुकीकन आणि धुरीकरण करणे अत्यावश्यक असल्याने तातडीने अमलबजावणी करावी, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »