Press "Enter" to skip to content

वीजबिलात नागरिकांना सवलत द्यावी : शहबाज पटेल यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळानंतर वीज कंपनीने भलीमोठी वीजदेयके पाठवून जनतेला मोठा शॉक दिला आहे. त्यामुळे सामान्य जनता हतबल झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक सर्वांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामध्ये सर्वसामान्य आणि गरीब जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहे. त्यामुळे विद्युत बिलांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांना अंदाजे भरघोस लाईट बिले पटविण्यात आल्याचे पटेल यांनी नमूद केले आहे. लॉक डोवनमुळे आलेल्या आर्थिक संकटात घर चालविणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे अचानक आलेली मोठी बिले कशी भरावी , असा प्रश्न नागरिकांना पडलाय. शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी पटेल यांनी केली आहे.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »