Press "Enter" to skip to content

के.जी.बी.फॉउंडेशनच्या माध्यमातून गरजू नागरिकांना सॅनिटायझरचे वाटप

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : के जी बी फॉउंडेशनच्या माध्यमातून खारघर परिसरातील किरकोळ भाजीपाला, दूध विक्रेते आणि गरजू नागरिकांना कोरोनापासून स्वतःचा आणि संपर्कात येणाऱ्या रहिवाश्यांचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क वाटप केले. भाजीपाला विक्रेते दिवसभर विविध ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना भाजीपाला विकतात आणि तसेच सफाई कर्मचारी हे दिवसभर विविध ठिकाणचा कचरा उचलतात. ह्या लोकांचा जनतेशी संपर्क येतो. हे ओळखून संस्थेचे प्रा. कुलदीप भालेराव, डॉ, आसमत आरा शेख, सेजल म्हसकर, निनाद पाटील, इक्बाल सिंग,नेहा शर्मा,किरण मोहिते, निहार घरत ह्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला. ह्या उपक्रमास विशेष सहकार्य समाजसेवक मिलिंद चौधरी ह्यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष आणि माजी सैनिक जि डी भालेराव ह्यांनी उपक्रमावर मत मांडताना सांगितले कि जनतेने पोलीस यंत्रणा आणि प्रशासनास कोरोना विरोधी उपक्रमात सहकार्य करावे आणि विनाकारण घराबाहेर पडू नये.