Press "Enter" to skip to content

कोरोनाला हरवायचं असेल तर स्वयंशिस्त पाळा – पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आवाहन !

!! संजना महाडिक !!
पनवेल : कोरोनाला हरवायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी, शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे, सोशल डिस्टंसिंगचे गांभीर्याने पालन केले पाहिजे, कोरोनाच्या लढाईत नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोकण दर्पणशी बोलताना केले. पनवेल मनपा क्षेत्रात बाधितांचा आकडा काही दिवसात वाढलेला जरी दिसत असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जास्तीत-जास्त आरोग्य सुविधा कशी उपलब्ध करता येईल, याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत आहे, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नमूद केले.

पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख पुढे म्हणाले ,पनवेल महानगरपालिका हि रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका आहे. जिल्ह्याचे मुख्यालय हे अलिबाग येथे आहे. जिल्ह्यतील नागरिक वैद्यकीय सुविधांसाठी पनवेल किंव्हा मुंबईमध्ये असलेल्या आरोग्याच्या सुविधांवर अवलंबून आहेत. हि सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पनवेल महापालिकेने कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध केली असल्याचे आयुक्त देशमुख यांनी नमूद केले आहे.

पनवेल शहरा राहणारी लोकं हे मोठ्याप्रमाणात मुंबईत दररोज जाणारा नोकरवर्ग आहे . मंत्रालयापासून ते लहान-मोठ्या कंपनीत काम करणारी नोकरवर्ग संख्या आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात वाढलेला ९० ते ९५ टक्के कोरोनाचा प्रादुर्भाव हा मुंबईतून दररोज ये-जा करणार्यांमुळे आहे, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नमूद केले. बाहेरून येणार्यांमुळे कुटुंबात कोरोनाचा संसर्ग झाला आणि हि साखळी वाढत गेली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने विविध आरोग्य सुविधांची उपाययोजना केली आहे. पनवेल येथील इंडिया बुल्स इमारतीतील २००० खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. कोरोना संशयित रुग्णांची तिथे सोय करण्यात आली आहे. अलगीकरणसह जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, ज्यांच्यात कोरोनाची मेजर चिन्ह दिसत नाहीत , अशा रुग्णांना वेगळ्या खोलीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने गंभीर लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांसाठी एम जी एम हॉस्पिटल कोमोठे आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली आहे. सध्यस्थितीत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात १५० बेड्स आणि , एमजीएम रुग्णालयात ३५० बेड्सची व्यवस्था आहे, अशी माहिती आयुक्त देशमुख यांनी यावेळी दिली.

पावसाळ्यात कोरोना सोबत अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे , त्यामुळे पनवेल शहरात आणखी वैद्यकीय उपाययोजना केल्या जात आहेत .पोलोराइझ खारघर हे खाजगी कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केले आहे, असे देखील देशमुख यांनी सांगितले. पनवेल येथे सुरु करण्यात आलेल्या स्वस्थ रुग्णालयात १०० बेड्स आहेत. सदर खाजगी रुग्णालय ऑक्सिजनसह सर्व सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देणार आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. पनवेल शहरात इतर ठिकाणी जे जे शक्य आहे ते करीत आहोत. देवांशी हॉस्पिटलमध्ये १०० पॉझिटिव्ह रुग्ण घेऊ शकतो, अशी व्यवस्था केली जात आहे. खारघरमध्ये पोलिसांसाठी ५० बेड्सचे रुग्णालय सुरु करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील रुग्णांना देखील आरोग्य सुविधा देत आहोत , त्यामुळे पनवेल मनपा प्रशासनावर प्रचंड ताण आहे , मात्र आम्ही लढतो आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात १५ ० ऑक्सिजन युक्त बेड्सची व्यवस्था करण्यात येत असून ४४ बेड्सची सुविधा कार्यन्वित झाली असल्याचे सांगत आयुक्त देशमुख यांनी पनवेलकरांना दिलासा दिला. उपजिल्हा रुग्णालयात १० बेड्सचे आयसीयू कशी सुरु करण्यात आले आहे तर आयसीयूचे १० बेड्सची सुविधा एमजीएम कामोठे हॉस्पिटलमध्ये कारण्याकत आल्याचे आयुक्त देशमुख म्हणाले.

कोरोनाने जगाला हैराण केले आहे. मात्र ,आलेल्या परिस्थितीला , आपत्तीला सामोरे जाणयासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे आपल्या हातात आहे.कोणतीही सुट्टी न घेता तणाव असताना अखंड सेवा प्रशासन देत आहे. पनवेलमध्ये ६ हजार बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील ७०० ते ८०० बेड्स कोविडसाठी आहेत. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांना उपचार मिळणार आहेत. मॅटर्निटीसाठी मनपा इमारतीत १५ ते २० प्रसूती होतील अशी व्यवस्था केली आहे. ४ ते ५ हजार रुग्णांना एकाचवेळी उपचार देण्याची यंत्रणा आम्ही उभी केली असून नेरूल येथील डी . वाय पाटील हॉस्पिटलशी देखील वैधकीय उपचारासंदर्भात बोलणे सुरु आहे, असे आयुक्त देशमुख म्हणाले.

पनवेलमध्ये टेस्टिंग वाढले आहे. अनलॉकमुळे गर्दी वाढली. त्यामुळे रुग्णांचा आकडा काहीसा वाढला आहे, मात्र मृत्युदर कमी असणे हि जमेची बाजू आहे. मृत्यूचे प्रमाण ३ ते ४ टक्के आहे, रुग्णांनाचा वाढत एकदा रोखून मृत्यू दर आणखी कमी करण्यासाठी पनवेलकरांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे , विनाकारण घराबाहेर पडू नये , लोकांच्या सेवा करण्याचे निमित्त सांगून फेरफटका मारू नये , घराजवळ अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून गयाव्यात , असे आवाहन आयुक्त देशमुख यांनी केले आहे. शासकीय सेवक व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा, आपले कुटुंबियांसाठी, स्वकीयांसाठी काळजी घ्या, असे देखील आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले.