पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारत रक्षा मंच या संघटनेचा दशकपूर्ती सोहळा खारघर येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला. भारत रक्षा मंचची स्थापना वर्ष २०१० ला भोपाळ येथे केली गेली. ‘बांग्लादेशी घुसपैठ: देशावरील मोठे संकट’ ह्या परिचर्चेतून सूर्यकांत केळकर यांनी संघटनेची स्थापना केली. आज देशांच्या २४ राज्यांमधे संघटनेचा विस्तार झालेला आहे. एन आर सी , जनसंख्या नियंत्रण कायदा, शिक्षणाचे भारतीयकरण, घुसखोर विरोधी कायदा अशा देशहिताच्या विविध विषयांवर ही संस्था कार्यरत आहे.
२७ जून २०२० रोजी भारत रक्षा मंचाला दहा वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा बीना गोगरी यांनी आपल्या कार्यलयात स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोरोनाची सद्य परिस्थिति पाहता मोजक्या लोकांच्या उपस्थितित हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. भा. र. मं. चे संघटन मंत्री प्रशांत कोतवाल जी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मंचाची दहा वर्षाची यशस्वी वाटचाल व आगामी योजना ह्या बद्दल सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमात गलवान घाटीतील वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली.
सदर प्रसंगी मंचाचे नाशिक जिल्हा संयोजक भूषण तिलक, राजेन्द्र अग्रवाल, आर. के. दिवाकर, नरेंद्र शर्मा, संजय सिंह, दिनेश पटेल, दिपक सिंह, अन्जु आर्या, निर्मला यादव, गीता पटेल आदि मान्यवर उपस्थित होते.
कोकण दर्पण.