पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सहचिटणीस प्रसाद सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या विरुद्ध अभद्र भाषेत केलेल्या विधाना ला प्रत्युत्तर म्हणून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस नारायण गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे अफरोज शेख, सचिन सोनावळे, चंद्रकांत पाटील, नितीन पाटील, हनुमान जाधव, बशीर खातीफ, आश्रफ तांबे, महिला मंडळ अध्यक्ष चम्पा विश्वास रेहाना खान, तपन विश्वास, निरंजन विश्वास, सदाशिव सलते सुरेश कोरे, साजन सिंग इत्यादी महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांची माफी मागावी, अशी जोरदार मागणी प्रसाद पाटील यांनी केली.
कोकण दर्पण .