Press "Enter" to skip to content

भारती विद्यापीठ आणि एबीएलइ यांच्यामध्ये सामंजस्य करार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट स्टडीज अँड रीसर्च आणि रायगड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ह्यांची उद्योजगता विकास विंग असोसिएशन ऑफ बिसनेस लीडर्स अँड इंटरप्रेनेऊर ह्यांच्यात सामंजस्य करार झाला. ह्या करारावर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. अंजली कळसे आणि ए बी एल इ चे संस्थापक सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नील ह्यांनी सह्या केल्या. ह्या कराराचा मुख्य उद्द्येश्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजगता विषयावर चर्चासत्र, कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी उपक्रम राबवणे हा आहे. ह्या कराराच्या माध्यमातून आत्मनिर्भर उद्योजक तयार होतील अशी अपेक्षा डॉ. विलासराव कदम, संचालक, भारती विद्यापीठ परिसर, मुंबई ह्यांनी व्यक्त केली.
प्रा. कुलदीप भालेराव (समन्वयक- सामंजस्य करार) ह्यांनी डॉ. विलासराव कदम, डॉ. अंजली कळसे, नील रमेश तसेच अमिता रमेश ह्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

कोकण दर्पण