३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी खारघर शहर व महिला सेल याच्या संयुक्त विद्यमानाने खारघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्धघाटन पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी,ए,पाटील व पालघर जिल्हा महिला निरीक्षक सुनीताताई देशमुख तसेच मानखुर्द तालुका अध्यक्ष नसीम खान व किशोर देवदेकर सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष याच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक विजय खानावकर ,जयराम रॉय , अजिनाथ सावंत ,युवक कार्यध्यक्ष पनवेल शहर जिल्हा शहबाज पटेल ,डॉ विरसिंह कदम , गणेश पाटील जिल्हा सचिव सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर,अफरोज शेख जिल्हा सचिव सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर,गणेश शितोळे देशमुख,मनोज सत्रे, स्वप्निल काटकर,स्वप्निल घोरपड़े, राजू राठोड सतीश अवघडे,महिला खारघर शहर उपाध्यक्ष विध्याराणी सकटे,सुनीता डेरे,संगीता पवार,रेखा भागवत,नेहा पाटील,स्नेहल शेवाळे,सोनाली पालव, इत्यादी कार्यकर्ते व पधादिकारी उपस्थित होत,
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी खारघर शहर महिला अध्यक्ष राजश्री कदम आणि खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी विशेष मेहनत घेतली अशी माहिती युवक कार्यकर्ते आमोल शिंदे आणि सचिन घाडगे यांनी दिली.

कोकण दर्पण.





