समाजकारण असो किंवा राजकारण, कार्यात सातत्य आणि निष्ठा अत्यावश्यक आहे. खारघर शहरातील असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे भाजप सोशल मीडियाच्या उत्तर रायगड जिल्हा सहसंयोजिका मोना अडवाणी होय. भाजपात मागील पाच वर्षांपासून सक्रिय असताना मोना अडवाणी यांच्या कामात सातत्य आणि भाजपप्रति अपार निष्ठा दिसली आहे.
मोना अडवाणी भाजपच्या खारघर मधील एक महिला कार्यकर्त्या. मात्र, त्यांच्या सामाजिक कार्यातील धडपडीमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्यावर भाजप खारघर शहर महिला मोर्चा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. सामान्य जनतेशी आणि भाजपातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी असलेला संवाद आणि समन्वय पाहून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोना अडवाणी यांच्यावर भाजपच्या सोशल मीडिया विभागाची जबाबदारी दिली. खारघर शहर आणि पनवेल तालुका स्तरावर आपल्या कार्याची चुणूक दाखविल्याने मोना अडवाणी यांची रायगड जिल्ह्यावर वर्णी लागली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांची सह संयोजिका म्हणून उत्तर रायगड जिल्ह्याची सोशल मीडिया विभागाची जबाबदारी दिली.ही जबाबदारी मोठ्या निष्ठेने त्या पार पाडत आहेत.
मोना अडवाणी एक प्रामाणिक आणि सच्चा सामाजिक कार्यकर्त्या आहेत. समाजासाठी काहीतरी करावे, ही त्यांची सतत धडपड असते. गरजू विध्यार्थी आणि महिलांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्यांचे हेच सामाजिक कौशल्य पक्षाला नक्कीच उपयुक्त ठरवणारे आहे. त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल यशस्वी होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा !!!

संजना महाडिक
संपादक,
कोकण दर्पण





