Press "Enter" to skip to content

खारघर फर्शीपाडा येथे निर्जंतुकीकरण ! शहबाज़ पटेल यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पावसाळयात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये आणि अन्य साथीच्या रोगांचा प्रसार बळावू नये म्हणून पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फर्शीपाड़ा गाव सेक्टर ३४ परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.

कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ‌महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष फारुकभाई पटेल, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल यांनी तळोजा आणि आजूबाजूच्या परिसरात विविध उपाययोजना , सामाजिक उपक्रम राबविले. फर्शीपाड़ा गाव सेक्टर ३४ येथे निर्जंतुकीकरण मोहीम राबवून शहबाज पटेल यांनी कोरोना विषयी सामाजिक जागृती देखील केली. याप्रसंगी युवक कार्यकर्ते इम्रान सुभेदार,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »