Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये आणखी १०० बेडच्या कोविड हॉस्पिटलची व्यवस्था !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळंबोली येथे १०० बेड असलेले कोविड हॉस्पिटसल सुरू करण्यात आले आहे.
पावसाळ्यात कोरोना(कोविड १९) चा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता पनवेल महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने कळंबोली येथील देवांशी इन येथे १०० बेडची व्यवस्था करण्यात आली असुन लवकरच सदर हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. सदर हॉस्पिटलची पाहणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ.कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त संजय शिंदे, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केली.
यावेळी  महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण