Press "Enter" to skip to content

कोरोना लढाईत सामाजिक दायित्व दाखविणाऱ्या व्यक्तींचा सामाजिक एकता संस्थेद्वारे सन्मान !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना लढाईत सामाजिक दायित्व दाखविणाऱ्या अनेक व्यक्तींचा सामाजिक एकता संस्थेद्वारे सन्मान करण्यात आला. पनवेल महापालिका क्षेत्रात गरीब व गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन सुरु झाले. यामुळे गोरगरीब जनतेवर जनतेवर उपासमारीची वेळ आली. हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर जगायचं कस आणि कुटुंबाला जगवायचं कसे असे प्रश्न भेडसावू लागले. कोरोनाच्या संकट प्रसंगी समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले . तळोजा व खारघर शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता जनसेवेमध्ये स्वतःला झोकून दिले. त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. सामाजिक एकता संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने सन्मान करण्यात आला . यावेळी मोहम्मद अफरोज शेख उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने पत्रकार गजानन चव्हाण साहेब ,संपादक संजय महाडिक, मंगेश नेरुळकर , मोहम्मद अफरोज शेख, कृष्णा मर्ढेकर, एडवोकेट संतोष खोपडे, अंतेश गवळी, महेश राऊत, इम्तियाज खान, चंद्रकांत पाटील सचिन सोनावळे, बालाजी इंगळे विजय पाटील, नितीन पाटील,चंपा विश्वास, निरंजन विश्वास, साजन सिंग आणि तपन विश्वास आदींचा काेविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी कृष्णा मर्ढेकर यांच्यावतीने अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

कोकण दर्पण.