Press "Enter" to skip to content

नागरिकांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय सरसावल्या ! नगरसेवकनिधीतून उभारले ओपन जिम !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनाच्या संकट काळात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे अत्यावश्यक आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय सरसावल्या आहेत. नगरसेवकनिधीतून हर्षदा उपाध्यय यांनी खारघर प्रभाग ५ स्थित सेक्टर ७ मध्ये असलेल्या मैदानात ओपन जिम सुरु केले आहे. सोशल डिस्टंसिन्ग नियमाचे पालन करीत नागरिकांनी ओपन जिमचा लाभ घेत व्यायाम करा, आपले शरीर तंदुरुस्त ठेवा , असे आवाहन नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी केले आहे.

कोरोना विषाणूंवर अद्यापि औषध सापडले नाही. सध्या सावध राहून, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाशी लढणे हा एकच पर्याय आहे. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. आपले शरीर तंदुरुस्त असेल तर कोरोनाचा टिकाव लागणार नाही. मात्र , सध्या बंधिस्त जिम देखील बंद आहेत. त्यामुळे मैदानात ओपन जिम सुरु करून हर्षदा उपाध्याय यांनी कोरोनाच्या काळात नागरिकांना आत्यावश्य्क भेट दिली आहे. नागरिकांच्या स्वास्थासाठी सभागृह नेते परेश ठाकुरजी यांच्या सहकार्याने खारघर मध्ये ओपन जिम सुरु केल्याची प्रतिक्रिया हर्षदा उपाध्याय यांनी व्यक्त केली. नगरसेवक निधीतून ओपन जिमचे साहित्य सेक्टर ७ खारघर मधील मैदानात बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात युवानेते अमर उपाध्याय यांनी मोठे योगदान दिले.

कोकण दर्पण.