Press "Enter" to skip to content

तळोजा गावामध्ये निर्जंतुकीकरण ! शहबाज पटेल यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. पावसाळा सुरु झाला आहे, पावसाळ्यात कोरोना आणि इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर तळोजा गावामध्ये निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल यांच्या नेतृत्वाखाली निर्जंतुकीकरण करण्यात आले.

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष फारुकभाई पटेल,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण तळोजा गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले, अशी माहिती शहबाज पटेल यांनी दिली. दरम्यान , कोरोनाच्या संकटात राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल तळोजा गावामधून शहबाझ पटेल यांचे कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी युवक कार्यकर्ते इम्रान सुभेदार, अहद पटेल, अरफ़ात पटेल, उमैर मुल्ला, मुजायद मुल्ला,निसार पटेल,सालिम पटेल, सलमान पटेल, नसीरुद्दीन पटेल,शेह्ज़ाद पटेल व इतर पदाधिकारी उपस्थित होते

पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल