Press "Enter" to skip to content

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राज्याचे पर्यावरणमंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खारघरमध्ये अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप वाटप करण्यात आले. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख नंदू वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला.

खारघर प्रभाग ६ मधील रिक्षाचालक, टॅक्सी चालक , भाजी मार्केट विक्रेते , रहिवासी यांना मोफत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे अर्सेनिक अल्बम ३० या रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघरमध्ये वास्तुविहार परिसरात सोशल डिसटिंगचे पालन करुन उपक्रम राबविण्यात आला. डॉ योगेशजी भडांगे यांच्या उपस्थितीत सर्वांना अर्सिनिक अल्बम ३० गोळ्याबद्दल माहिती दिली व त्यांचे सेवन कसे करावे व काय नियंमांचे पालन करावे याबद्दल मार्गर्दर्शन केले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »