Press "Enter" to skip to content

अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप ! लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपक्रम !

भाजपा खारघर – तळोजा मंडल उपाध्यक्ष संजय घरत यांचा उपक्रम !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून खारघरमध्ये अर्सेनिक अल्बम ३० या रोगप्रतिकारक होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मास्कचे देखील वाटप करण्यात आले. भाजपचे खारघर – तळोजा मंडल उपाध्यक्ष तथा माजी सरपंच संजय घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर विभाग आणि विशेषतः खारघर प्रभाग ५ मध्ये सदर उपक्रम राबविण्यात आला.

लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. यानिमित्ताने पनवेल आणि खारघरमध्ये विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संजय घरत यांच्या वतीने खारघर विभाग , खारघर प्रभाग ५ , सेक्टर ३, ४, ५ आणि बेलपाडा परिसरात अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे आणि मास्कचे वाटप वाटप करण्यात आले.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »