Press "Enter" to skip to content

कोरोना : खारघरमध्ये निर्जंतुकीकरण ! युवानेते संजय घरत यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना विषाणूचे संकट दिवसागणिक भीषण रूप धारण करत आहे. त्यामुळे सावधानता आणि सुरक्षा यामुळेच आपण आपल्याला वाचवू शकतो. त्यासाठी आपला परिसर स्वच्छ आणि निर्जंतुकीक असणे अत्यावश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर खारघर सेक्टर ४ परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. माजी सरपंच तथा भाजपचे खारघर – तळोजा मंडल उपाध्यक्ष संजय घरत यांच्या पुढाकाराने परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली.

जून महिन्याच्या प्रारंभीपासून पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे देखील होत आहेत, मात्र , रुग्ण वाढण्याची संख्या जास्त असल्याने पनवेलची चिंता वाढली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर विभागात देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत. खारघर सेक्टर ४ मध्ये काही दिवसात रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत. मात्र, संजय घरत यांनी स्थानिक नागरिकांना धीर देत त्यांचे मनोबल वाढविले आहे. कोरोनाला घाबरून न जात आपण त्याच्याशी लढले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे , आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, अशी भावना संजय घरत यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केली. खारघर सेक्टर ४ येथे वाढत्या कोरोना रुग्णांमुळे संजय घरत यांच्या पुढाकाराने संपूर्ण सेक्टर ४ परिसरात व सर्व इमारतींच्या पार्किंग लॉट तसेच जिण्यांवर सिडको कडून औषध फवारणी करून घेतली. संजय घरत यांनी प्रत्यक्ष उभे राहून फवारणी करून घेतली. तसेच सोसायटीतील नागरिकांशी कारोना व्हायरस बद्दल जनजागृती पर संवाद साधला.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »