Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त सॅनिटायझरचे वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनी बुधवारी कोरोना महामेरीच्या पार्श्वभूमीवर अजित दादा प्रतिषठान ,पार्थ पवार फाऊंडेशन हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंच संचलित हेमंतराजे धायगुडे पाटील ब्लड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी विशेष योगदानाने आणि पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसचिव तथा खारघर शहर प्रभारी कृष्णा मर्ढेकर, ऍड. संतोष खोपडे, रुपेश कदमसर, प्रसाद पाटील, जेष्ठ नागरिक सेल पनवेल जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब लबडे , प्रभाग खारघर अध्यक्ष महेशकुमार राऊत , प्रा. हेमंत धायगुडे पाटील यांच्या पुढाकाराने सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या वेळी पनवेल नायब तहसीलदार सूर्यवंशी ,शिधावाटप अधिकारी स्मिता जाधव, बार असोसियशनचे ऍड . मनोज भुजबळ, कळंबोली पोलिस स्टेशनचे श्री. दडंवते, कामोठे वाहतुक शाखेचे अंकुश खेडकर, खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार , खारघर वाहतुक विभागाचे आनंद चव्हाण , खारघर पोस्ट कार्यालय तसेच पनवेल महापालिका खारघर कार्यालयाचे श्री. भंडारी यांना सॅनीटायजरचे वाटप केलै. खारघर प्रभाग क्र.३, ४,५, ६ सेक्टर निहाय सेक्टर १२ ,३४ , ३५ , ३६ , गृहनिमार्ण सोसायटी मध्ये २००० लिटर सॅनिटायझरचे वाटप केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदर उपक्रमात पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खारघरचे अध्यक्ष राहुल पाटील, राहूल कोळी , आदेश साळवी ऍड.मंगेश मालुसरे, ऊतम डेरे, प्रदिप पाटील ,प्रमोद पवार ,गणेश शितोळे ,गणेश पाटील, राजु नाईक, शंकर सोनुले, बाळासाहेब भोसले ,अरूण पवार ,पाडुरंग पाबळेकर , नंदकुमार शिंदे ,के एस भट, मातलेस झा, रामदास नारकर, प्रशांत जांभुळकर, मनोज सत्रे , महिला अध्यक्षा राजश्री कदम , संगीता डेरे, कल्पना खरे, शेकाप खारघर शहर अध्यक्षा संगीता गुलाटी , महाविकास आघाडीचे युवक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

कोकण दर्पण.