Press "Enter" to skip to content

पोलिसांच्या उपचारासाठी नवी मुंबईत विशेष कोव्हिड हॉस्पिटल ! गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले उदघाटन !

प्रतिनिधी, नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल महापालिका क्षेत्रात रोडपाली कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल मध्ये ५० खाटांचे डेडिकेटेड कोव्हिडं १९ केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे सदर सेंटर साठी आयुक्तालयातर्फे फक्त चार दिवसांमध्ये अत्याधुनिक अशा आठ बाथरूमची सर्व सुविधा सह उभारणी करण्यात आलेली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन करण्यात आले.यावेळी पोलीस आयुक्त संजय कुमार , पनवेल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळामध्ये पोलिसांवर व्यवस्थित औषधोपचार मिळावे म्हणून या विशेष रुग्णालयाची सुरुवात केली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नेरुळ येथे 50 खाटांचे डेडिकेटेड covid-19 केअर सेंटर सावली बिल्डिंग येथे स्थापन करून चालू करण्यात आलेले आहे. याठिकाणी सुद्धा गृहमंत्र्यांनी भेट दिली. हे दोन्ही डेडिकेटेड covid-19 केअर सेंटरला नवी मुंबई महापालिका व पनवेल महानगरपालिकेकडून घोषित करण्यात आलेले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »