पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त १० जून २०२० रोजी कळंबोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील रूग्ण, रूग्णालयांची रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदानाचे शिबीर आयोजित करून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आले. कोरोना संकटामुळे हा वर्धापन दिन सार्वजनिकरित्या साजरा करता आला नसला तरी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे या भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पडत नाही परंतु राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसैमिया व अन्य रूग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, व नागरिकांनी पुढे यावे स्वत: रक्तदान करावे, इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे व रक्त संकलनाच्या कार्यास हातभार लावावा असे आवाहन नगरसेवक श्री. विजयशेठ खानावकर यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत तब्बल ४८ थैल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.
नगरसेवक विजयशेठ खानावकर यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील यांनी केल्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान करण्यात आले.
यावेळी सुदामशेठ पाटील कार्याध्यक्ष पनवेल शहर काँग्रेस, प्राचार्य बी. ए. पाटील, नेरे ग्रामपंचायत उपसरपंच दर्शन ठाकूर सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर, जिल्हा सरचिटणीस अजिनाथ सावंत, खारघर अध्यक्ष बळीराम नेटके, खारघर महिला अध्यक्षा सौ. राजश्री कदम, मनोहर सत्रे, युवक जिल्हा उपाध्यक्ष विलास खरटमोल, युवक कार्याध्यक्ष शहबाज पटेल, स्वप्नील काटकर, अनिल गायकवाड, मयुर मोरे, शुभम पवार, शैलेश लोंढे, राहुल यमगरणी, दिलीप तांबे, रोहन कदम, दादा दुधाळ, नितेश उबाळे, अजिंक्य पोळ, अमोल गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.






