Press "Enter" to skip to content

अष्टपैलू व्यक्तिमत्व, दिलदार दोस्त : ब्रिजेश पटेल !

भाजपा खारघर शहराचे खंभीर नेतृत्व !!

संजय महाडिक
पनवेल महानगर आणि खारघर शहरातील एक अष्टपैलू नेतृत्व म्हणजे भाजपा खारघर – तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल होय.
खरंतर ब्रिजेश पटेल हे पक्ष बांधणीचा कणा आहेत. सुरुवातीच्या काळापासून खारघर शहरात भाजपाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते , खारघर शहराचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजकारणात अनेक उलथापालथ होतात, मात्र, ब्रिजेश पटेल यांच्या भाजप निष्ठेला तोड नाही. संघटन कौशल्याच्या जोरावर ब्रिजेश पटेल यांनी खारघर शहरात भाजपला वाढविण्यासाठी आरंभीपासून प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर भाजपात आल्यानंतर पनवेल आणि खारघर शहर भाजपमय झाले. मात्र, ब्रिजेश पटेल यांचे भाजपातील स्थान कायम राहिले.
एका हाडाच्या कार्यकर्त्याला सामाजिक जाणिव असायला लागते लागते, ब्रिजेश पटेल यांनी सामाजिक जबादारी कायम पार पाडली. नेहमीच सामाजिक जाणीव जपली. भाजपात काम करताना सामान्य कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत आदराने आणि संयमाने वागणे हा त्यांचा उत्तम स्वभाव गुण आहे. याचा फायदा पक्ष संघटन वाढण्यासाठी झाला आणि होतोय.
सार्वजनिक कामासाठी सिडको असो, पनवेल पालिका असो किंव्हा पोलीस प्रशासन असो तत्परतेने धावत जाण्याची ब्रिजेश यांची कार्यशैली आहे. प्रेमळ,मायाळू आणि शांत स्वभाव गुण असल्याने सर्वचजण त्यांचे मित्र आहेत. विशेषतः पत्रकार बंधुशी ब्रिजेश पटेल यांचे मैत्रीचे, बंधुत्वाचे, आपुलकीचे नाते आहे.
ब्रिजेश पटेल हे “कोकण दर्पण” परिवाराचा एक भाग आहेत. कोकण दर्पणच्या प्रत्येक समाजोपयोगी कार्यक्रमात ब्रिजेश पटेल यांचे योगदान, सहभाग नेहमीच मोलाचे ठरले आहे.
ब्रिजेश पटेल यांची सामाजिक ,राजकीय कारकीर्द यशस्वी होवो, हीच वाढदिवसानिमित्ताने त्यांना कोकण दर्पण परिवाराकडून सदिच्छा!!!