Press "Enter" to skip to content

धडाडीचे युवा नेतृत्व : शहबाज पटेल !

पनवेल तालुक्यातील धडाडीचे युवा नेतृत्व म्हणजे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज फारूक पटेल होय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून अगदी लहानपणापासून आपल्या वडिलांकडून शहबाज यांना समाजकारणाचे आणि राजकारणाचे बाळकडू मिळाले. सामाजिक जाणीव खऱ्या अर्थाने शहबाज यांच्यामध्ये निर्माण झाली, त्यामुळे खऱ्या अर्थाने एक धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून शहबाज यांनी पनवेल शहर आणि तळोजा परिसरात आपला ठसा उमटविला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते फारूक पटेल यांचे शहबाज हे चिरंजीव आहेत. फारूक पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची निष्ठा कायम जपली आहे. पक्ष वाढीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. समाजकारण आणि राजकारणाचा तोच धागा पकडून शहबाज पटेल पनवेल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांच्या सारख्या धडाडीच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील अनेक युवक राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत आहेत. पनवेलमध्ये आणि विशेषतः तळोजा विभागात पक्ष वाढीसाठी शहबाज सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या मनात आपली ओळख निर्माण केली आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शहबाज वडिलांसोबत सामाजिक , राजकीय कार्यक्रमांना जात होते. त्यामुळे लहानवयातच त्यांच्या मनावर सामाजिक आणि राजकीय संस्कार कोरले गेले.त्याची उपयुक्तता साधत शहबाज आता सक्रिय राजकारणात उतरले आहेत. पनवेल तालुक्याच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यानंतर त्यांच्यावर पनवेल तालुका युवक कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने दिली. तेव्हापासून विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून शहबाज यांनी आपला ठसा उमटविला आहे. सामाजिक आणि सार्वजनिक कामांचा त्यांनी धडाका लावला. पनवेल आणि तळोजा विभागातील विविध नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासन, सिडको प्रशासन , पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात शहबाज यांचा नेहमीच पुढाकार असतो. लॉक डाऊनच्या काळात शहबाज यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. तब्ब्ल तीन महिने दररोज सुमारे ५०० गोरगरीब जनतेला अन्नदान केले. फळ वाटप , अन्नधान्य वाटप केले. कोरोना रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून रक्तदान शिबीर घेतले. पनवेल तालुक्यामध्ये पार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या वतीने सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील युवकांच्या विविध प्रश्नांवर काम करायचे आहे, शिक्षण, रोजगार याबाबतच्या शासनाच्या योजना युवा पिढीपर्यंत पोहचवायच्या आहेत, देशासाठी युवकांचे योगदान महत्वाचे आहे , हि भावना युवकांमध्ये निर्माण करायची आहे, अशी भावना शहबाज पटेल यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली. पनवेल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी युवकांची मोठी फळी आम्ही तयार करीत आहोत, असे देखील शहबाज यांनी नमूद केले.