पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : लॉक डाऊन काळात खारघर शहरातील गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील पुढे सरसरसावली. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
अजितदादा पवार प्रतिष्ठान , पार्थदादा फाउडेंशन आणि सदगुरु एंटरप्रायजेस खारघर नवी मुंबई यांच्या माध्यमातून खारघर सेक्टर ३०, ३६, तळोजा जेल,टाटा हाॅसपीटल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर प्रभारी कृष्णा मर्ढेकर, पनवेल शहर जिल्हा सह-सचीव ऍड. संतोष खोपडे, समाजसेविका स्वाती खोपडे, खारघर प्रभाग क्रमांक ५ चे अध्यक्ष महेशकुमार राऊत यांनी गरजू लोकांसाठी दैंनदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये प्रत्येकी ५ किलो तांदूळ ,५ किलो बटाटे, ५ किलो कांदे असे २०० लोकांना वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँगेसच्या सदर उपक्रमाचे खारघरवासियांनी कौतुक केले आहे. या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा राजश्री कदम, कलपना खरे, प्रशांत जाभुळकर, रामदास नारकर, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते , पदाअधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहकार्य केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर प्रभारी कृष्णा मर्ढेकर यांनी दिली.
कोकण दर्पण.





