पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : “मी रक्तदान करणार , माझ्या एका भावाला जिवनदान देणार” या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपक्रमाला चालना देण्यासाठी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी खारघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये १२५ रक्तदात्यांची आपले रक्तदानाचे कर्तव्य बजावले.
आज संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दोन लाखाचा आकडा पार केला आहे. राज्यात देखील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. वाढत्या कोरोना रुग्णांसाठी रक्ताची गरज पडत आहे. महाराष्ट्र शासनाने रक्तदान शिबिरे घेण्याचे अगोदरच आवाहन केले आहे.
कोरोना विरुध्दच्या लढ्यात सहभाग घेत “मी रक्तदान करणार , माझ्या एका भावाला जिवनदान देणार” हा उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राबविला जात आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.त्यानुसार पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले . यावेळी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल ,कार्याध्यक्ष शहबाझ पटेल,उपाध्यक्ष विलास खरटमोल,इम्रान सुभेदार,इसानुर शेख, विशाल घाडगे,तुषार मानकर, व पदाधिकारी यांच्यासह १२५ जणांनी रक्तदान केले. उपक्रमांत सहभागी होऊन कोरोना विरुध्द लढ्यात सहभाग घेतला.
कोकण दर्पण.