संजय महाडिक :
माणसात जर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची हिम्मत असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही माणूस उभा राहतो. प्रयत्नात सातत्य असेल तर यशाची पायरी गाठणं शक्य होते. आयुष्यात एक नवी निर्माण होते. पनवेल महापालिका क्षेत्रातील असेच एक धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे अशोकभाऊ मोटे होय. अशोकभाऊ मोटे हे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्जितले कार्यकर्ते आहेत. पनवेल भाजपच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. पनवेलच्या राजकारणात अशोकभाऊ मोटे यांचे वलय आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोकभाऊनी गरिबी जवळून पहिलीय. गरिबी अगदी पाचवीला पुजलेली होती. कुटुंबाच्या परिस्थितीची प्रतिकुलता अशोकभाऊना लहानपणी उमजली. आपल्या आई वडिलांच्या खांद्यावरील परिस्थितीचे ओझे थोडेसे कमी करावी, असे अशोकभाऊंना नेहमी वाटे. त्यांनी एक पाऊल कष्टाच्या दिशेने टाकले. आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावला.
आपण ज्या समाजात जन्मलो, वाढलो त्यासमाजसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही प्रामाणिक भावना अशोकभाऊंनी जपली आहे. सामाजिक बांधिलकीची भावना त्यांना सामाजिक कार्यात अधिक सक्रिय करून गेली. मागील अनेक वर्षांपासून अशोकभाऊ कळंबोली, पनवेलमध्ये कार्यरत आहेत. समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून अशोकभाऊंनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
पनवेलच्या राजकीय पटलावर देखील अशोकभाऊंचे नाव आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका निवडणुकीत उतरविले. तेव्हा विजयश्री थोडक्यात हुकली, मात्र, सामाजिक कार्यात अखंडता कायम आहे. हीच एका सामान्य जनतेच्या सच्चा नेत्यांची ओळख आहे. तळागाळातील समाजासाठी सदैव धावून जाणारा एक धडाडीचा नेता असे अशोकभाऊंचे व्यक्तिमत्व आहे.
अशोकभाऊ हे पनवेल तालुक्यातील धनगर समाजाचे एक खंबीर नेतृत्व आहे. समाजाच्या न्याय-हक्काच्या लढाईत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. घाटमाथा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अशोकभाऊ घाटमाथ्यावरील लोकांची एकत्र मोट बांधण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
अशोकभाऊ मोटे यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द अशीच उत्तरोत्तर वाढो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्ताने सदिच्छा !
कोकण दर्पण.