Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने घरकुलमध्ये अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप ! अमित घोरपडे , स्वप्ना घोरपडे यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर सेक्टर १५ मधील घरकुल संकुलात अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप करण्यात आले. खारघर मधील सामाजिक कार्यकर्ते अमित घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना घोरपडे यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला.

सध्या कोरोनाचे भयंकर संकट देशावर आहे. त्यामुळे कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. घोरपडे व स्वप्ना घोरपडे यांच्या वतीने घरकुल संकुलात अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आयुष्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार डॉ. श्वेता अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेले अर्सेनिक अल्बम ३० हे औषध मोफत वाटप करण्यात आले. सोशल डिस्टेनसिंग नियमाचे पालन करीत सदर उपक्रम राबविण्यात आला. घरकुलमधील अनेक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.

कोकण दर्पण.