Press "Enter" to skip to content

खारघर युथ कौन्सिलच्या वतीने महापौर मदत निधीला ३५ हजार रुपयांचा धनादेश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरात कार्यरत असलेल्या खारघर युथ कौन्सिलच्या वतीने पनवेल महानगरपालिका महापौर मदत निधीला ३५ हजार रुपयांचा धनादेश सोमवारी देण्यात आला आहे. युथ कौन्सिलच्या सदस्यांनी सदर रक्कम वैक्तिकपणे जमा करून पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सदर रकमेचा धनादेश सुपूर्द केला.

कोरोनाच्या लढाईत समाजातील दानशूरांनी हातभार लावावा , असे आवाहन पनवेल महापालिका प्रशासनाने याअगोदरच केले आहे. त्यासाठी पनवेल महापालिका महापौर मदत निधी अर्थात मेयर रिलीफ फंडाची स्थापना पनवेल मनपा प्रशासनाने केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक दानशूरांनी मेयर रिलीफ फंडात आर्थिक मदत केली आहे. सदरच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.
खारघर सेक्टर १६ वास्तु विहार येथील खारघर युथ कौन्सिल या संस्थेच्या सदस्यांनी कोरोना काळात प्रशासनाला मदतीसाठी टंचाई भासु नये, हा उद्देश ठेवून खारघर युथ कौन्सिल संस्थेच्या सदस्यांनी एकत्रित केलेली रक्कम रुपये ३५०००/- इतक्या रकमेचा चेक (धनादेश)सोमवारी पनवेल महानगर पालिकेचे महापौर मदत निधीस आयुक्त सुधाकर देशमुख साहेब व उपायुक्त जमिर लेंगरेकर यांच्या उपस्थितीत सुपुर्द केला. यावेळी संस्थेचे चेअरमन दिलीप मस्के , सदस्य तथा खारघर मधील सामाजिक कार्यकर्ते नंदु वारुंगसे , प्रकाश पवार आदी उपस्थित होते.