Press "Enter" to skip to content

धडाडीचा युवानेता : गुरू ठाकूर !

संजय महाडिक

सार्वजनिक उत्सवातून खारघरशहरामध्ये सामाजिक एकात्मता निर्माण करणारा खारघर शहरातील धडाडीचा युवानेता म्हणजे गुरू ठाकूर होय. गुरू ठाकूर हे भारतीय जनता पार्टीचे खारघर- तळोजा मंडलाचे चिटणीस आहेत.

मागील अनेक वर्षांपासून खारघर मध्ये गुरू ठाकूर सामाजिक कार्य करीत आहेत. लहानपणापासूनच गुरू ठाकूर यांना सामाजिक कार्याची आवड आहे. स्वतः भूमीपुत्र असल्याने तळागाळातील समाज्याच्या वेदना त्यांना माहीत आहे. आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. गुरू ठाकूर यांच्यात नेतृत्व गुण आहे. त्यांनी खारघर मधील तरुणांना एकत्र करून सिद्धीविनायक मंडळाची स्थापना केली. तरुणांना एकत्र आणले. त्यामाध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. सार्वजनिक गणेशोत्सव ,सार्वजनिक नवरात्रोत्सव कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता स्थापन केली. खारघर मधील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना एकत्र आणले.

गुरू ठाकूर यांची धडपड पाहून ,सामाजिक कार्य पाहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्यावर भाजप खारघर तळोजा मंडलाच्या चिटणीस पदावर नियुक्ती केली. त्या माध्यमातून गुरू ठाकूर यांनी आपल्या सामाजिक कार्याची गती वाढवली आहे.

गुरू ठाकूर यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला कोकण दर्पण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.!

कोकण दर्पण