Press "Enter" to skip to content

सामान्य जनतेचा सच्चा नेता : जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील !

संजय महाडिक :

सामान्य जनतेच्या मदतीसाठी कधीही धावून जाणारा सामाजिक जाणिवेचा नेता म्हणजे पनवेल महानगरपालिकेच्या अ प्रभाग समितीचे माजी सभापती तथा जेष्ठ नगरसेवक आणि मुर्बी- खारघरचे सुपुत्र अभिमन्यू पाटील होय. अभिमन्यू पाटील हे भाजपचे रायगड जिल्ह्यातील नेते आहेत.

अभिमन्यू पाटील यांच्या व्यक्तिमत्वाची अनेक वैशिष्टये आहेत. ते एक अष्टपैलू नेतृत्व आहे. मोठ्या संघर्षातून त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. व्यवसाय असो कि सामाजिक कार्य अथवा राजकारण असो अभिमन्यू पाटील यांनी मोठ्या संघर्षातून आणि कष्टाने सर्वकाही उभे केले आहे.शिक्षण घेतानाच व्यवसाय सुरु केला. व्यवसाय करताना सामाजिक कार्याची जोड दिली. अफाट कष्ट , जिद्द , मेहनत , असीम प्रामाणिकपणा हे अभिमन्यू पाटील यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्टये आहेत.

समाजकारणातून राजकारणात उतरले. खारघरमधील जनतेची खूप सेवा केली. मात्र, राजकीय यश त्यांना मिळत नव्हते. अनेक निवडणूक त्यांनी लढल्या. विजयश्री थोडक्यात हुकत होती . मात्र, अभिमन्यू पाटील यांनी जिद्द सोडली नाही. जनसेवेचे सातत्य कायम ठेवले. आपण जिंकायचेच असा त्यांनी देखील निर्धार केला होता. अखेर विजयश्री मिळाली. रायगड जिल्ह्यात स्थापित झालेल्या ऐतिहासिक पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अभिमन्यू पाटील निवडून गेले. राजकीय विरोधकांनी अभिमन्यू पाटील यांना अनेकदा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र अभिमन्यू पाटील यांनी एकदिवस अशा विरोधकांना जागा दाखवली. त्यांच्या आयुष्यातील हे मोठे राजकीय यश आहे.

खारघर प्रभाग क्रमांक ४ मधून पनवेल महापालिकेत जिंकून गेल्यानंर अभिमन्यू पाटील यांनी आपल्या विभागातीलच नव्हे तर खारघरमधील कामांचा धडाका लावला. रस्ते, दिवाबत्ती, गटारे , शाळा ,पाणी ,कचरा असे अनेक विषय हाताळले. सिडको आणि पालिकेचा पाठपुरावा करून अनेक विकासकामे पूर्ण केली. अभिमन्यू पाटील यांच्या कार्याचा धडाका पाहून लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी अभिमन्यू पाटील यांच्या पनवेल महानगरपालिका अ प्रभाग समितीच्या सभापती पदाची जबाबदारी दिली. त्या जबाबदारीला देखील अभिमन्यू पाटील यांनी न्याय दिला.

सध्या कोरोनाचे संकट पनवेल महानगरावर घोंगावत आहे. अशा वेळी गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे राहून अभिमन्यू पाटील यांनी मानवतेचे दर्शन दिले आहे. खऱ्या अर्थाने अभिमन्यू पाटील सामान्य जनतेचा सच्चा नेता म्हणून सिद्ध झाले. अभिमन्यू पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीला कोकण दर्पण परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा !

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »