Press "Enter" to skip to content

नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या वतीने मोफत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळ्या व मास्कचे वाटप !

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ओवे कॅम्प येथे वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा :
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.४च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या गोळ्यांचे रविवारी ओवे कॅम्प येथील जवळपास 500 कुटुंबियांना सदर गोळ्यांचे व मास्कचे मोफत वाटप पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील,खारघर तळोजा मंडळ भाजपा अध्यक्ष ब्रिजेशभाई पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव ,किरण पाटील, भरत कोंढाळकर, ओवे कॅम्पचे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस रामचंद्र जाधव, ओवे कॅम्प बूथ अध्यक्ष संतोष रेवने,सुनील साळुंखे, संतोष भातोसे,दिपक साळुंखे यांच्या उपस्थितीत व होमिओपॅथीक तज्ञ डॉ .मयुरेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर प्रसंगी प्रस्तावना करतांना किरण पाटील यांनी सांगितले की लोकनेते रामशेठ ठाकूर ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी सर्व भाजपाचे लोकप्रतिनिधी , पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे सदर वाढदिवस हा रामशेठ ठाकूर यांच्या शिकवणी नुसार सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरा करत असतात* . यावर्षी देशावर आलेले कोरोना संसर्गजन्य आजराचे सावट लक्षात घेता समाजातील लोकांना त्यांच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्ताचे असे होमिओपॅथीक गोळ्यांचे व मास्कचे वाटप करत साजरा करण्यात आला. नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस हा नेहमी लोकहिताचे कार्यक्रम करून साजरा करत असतो त्यांनी रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. डॉ मयुरेश इंगळे यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांच्या बद्दल माहिती दिली व सदर काळात त्या कश्या आवश्यक आहेत तसेच त्यांचे सेवन कसे करावे व काय नियंमांचे पालन करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »