पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी होमिओपॅथिक औषध अर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप तळोजा फेज-1 व फेस 2 या परिसरामध्ये करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला.
गेल्या काही दिवसापासून लोकांमध्ये या औषधाच्या संदर्भात जागरूकता निर्माण झाल्यानंतर लोकांकडून या औषधांची सतत मागणी होत होती. जवळजवळ 100 सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना व अन्य जनतेला या औषधाचा मोफत वितरण करण्यात आले.
सदर कार्याचे कौतुक विविध थरातून होत आहे. या कार्यामध्ये प्रसाद पाटील यांच्यासोबत चंद्रकांत पाटील सचिन सोनावळे तपण विश्वास निरंजन विश्वास विजय पाटील विजय लोहार नितीन पाटील चंद्रशेखर मोरे या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला व सोशल डिस्टन्स इन चे पालन करून सदर वाटप करण्यात आले
गोळ्यांचे वाटप !
प्रतिनिधी, पनवेल : आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी होमिओपॅथिक औषध अर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप तळोजा फेज-1 व फेस 2 या परिसरामध्ये करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला.