पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील स्पेगेटी मास हौसिंक्सग सोसायटीत सँनिटायझर फवारणी करावी व आरोग्य मोहीम राबवावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते सुनिल सावर्डेकर यांनी पनवेल महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
खारघर शहरतील अनेक रहिवाशी नोकरी निमित्ताने मुंबई ,ठाणे,कल्याण,या ठिकाणी जाऊन जनसेवा करत आहेत. तसेच सेक्टर 15 खारघर येथे सिडकोने मोठ्या प्रमाणात मास हौसिंग सोसायटी निर्माण केली आहे त्यामध्ये 34 हजार वर लोकसंख्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस ,सरकारी,निमसरकारी, महानगरपालिका,नगरपालिका, मध्ये नोकरी करणारे जास्त प्रमाणात नागरिक आहेत सद्या कोरोना महामारी चा पादुरभाव मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामध्ये घरकुल, स्पँगेटी, वास्तुविहार, सेलिब्रेशन तसेच खारघर परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जर पनवेल महानगरपालिका आरोग्य खाते कडून सर्व सोसायटी मध्ये सँनिटायझर फवारणी करावी व आरोग्य शिबिराची सेवा द्यावी, असे सुनिल सावर्डेकर यांनी निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकावरील दडपण कमी होईल तसेच खारघर शहर कोरोना मुक्त होईल,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
कोकण दर्पण





