Press "Enter" to skip to content

उरणचे आमदार महेश बालदी यांनी केला ठाकरे सरकारचा निषेध !

उरण, कोकण दर्पण वृत्तसेवा : संपूर्ण देशातील कोरोना बाधित रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्ण हे फक्त महाराष्ट्रात आहेत. राज्य कोरोनाच्या संकटात आहे, मात्र, ठाकरे सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले आहे, असा जोरदार हल्ला चढवीत उरणचे आमदार महेश बालदी यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला. आमदार महेश बालदी यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला.
कोरोना लढाईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कसे सपशेल अपयशी ठरले, याचा ठपका ठेऊन भाजपने राज्यव्यापी निषेध आंदोलन केले. उरण तालुक्यात देखील आमदार महेश बालदी याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »