Press "Enter" to skip to content

भाजप करावे विभागाने केला महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा निषेध !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या लढाईत महाराष्ट्रातील आघाडी सरकार सपशेल हरल्याचा ठपका ठेवून भाजपने शुक्रवारी पुकारलेल्या महाराष्ट्रव्यापी निषेध आंदोलनात नवी मुंबई भाजप देखील हिरीरीने सहभागी झाली.
नेरुळ-करावे भाजपच्या वतीने देखील निषेध नोंदविण्यात आला. भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्र ११० करावे तर्फे महाराष्ट्र बचाओआंदोलन” करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र राज्य सरकार अपयशी ठरल्याने या आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करावे येथील जनसंपर्क कार्यालय जवळ हे आंदोलन करण्यात आले.

कोकण दर्पण