पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर विभागातील सेक्टर ७ मधील संपूर्ण हिरानंदानी परिसरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी ईश फाऊंडेशनने पनवेल महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. पालिका प्रशासनाने देखील गंभीरपणे दखल घेत तातडीने निर्जंतुकीकरण केले.
ईश फाउंडेशन खारघर यांनी २१ मे रोजी पनवेल मनपाला मेल पाठविला होता. खारघर हिरानंदानी सेक्टर -७ च्या संपूर्ण क्षेत्राचे ‘सेनेटिझेशन’ करण्यास सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय लोक गावाला जाण्यासाठी परवानगी हवी म्हणून पोलीस ठाण्यात येत होते. खारघर पोलिसांचे बहुतेक अधिकारी तिथे जमत होते. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून परिसरात निर्जंतुकीकरण करणे गरजेचे होते. त्यानुसार जितेंद्र मढवी आणि धनंजय हरीश म्हात्रे या पालिका अधिकारी यांच्या सहकार्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले.
यावेळी ईश फाऊंडेशनच्या संस्थापिका कीर्ती मेहरा, अध्यक्ष आणि सदस्या दिव्या मेहरा तिथे उपस्थित होते तसेच उपनिरीक्षक हेमंत बाळू डेरे त्यांच्या टीमसमवेत तेथे उपस्थित होते.





